हा तर सांस्कृतिक दहशतवाद, किरण माने यांनी घेतली शरद पवार यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केवळ राजकीय भूमिका घेतल्यामुळे मला टीव्ही मालिकेतून कोणतेही कारण न देता काढण्यात आले. हा एक प्रकारचा सांस्पृतिक दहशतवादच आहे, अशा शब्दांत अभिनेते किरण माने यांनी आज आवाज उठवला. आपण पोटार्थी नट नसल्यामुळे एका मालिकेतून बाहेर काढल्यामुळे मी काही रस्त्यावर येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी ठणकावून सांगितले.

राजकीय भूमिका घेत सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या मुद्दय़ावरून अभिनेते किरण माने यांना ‘स्टार प्रवाह’ या टीव्ही चॅनेलवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून निर्मात्यांनी बाहेर काढले आहे.

या प्रकाराबद्दल किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर किरण माने यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. ते  म्हणाले, या सांस्कृतिक दहशतवादाबद्दल मी आवाज उठवायचा ठरवला तेव्हा माझ्या नजरेसमोर खासदार शरद पवार हे एकच नाव आले. कारण शरद पवार हे तटस्थपणे सर्व ऐकुन घेतात.

आजच्या घडीला शरद पवार यांच्याइतका जाणता, विचारी, विवेकी व सांस्पृतिक क्षेत्राची जाण असणारा नेता नाही. त्यांची माझी तीस मिनिटांसाठी भेटीची वेळ ठरली होती, पण त्यांनी तब्बल दीड तास भेटीचा वेळ दिला. या प्रदीर्घ भेटीत मी त्यांना माझी राजकीय भूमिका व माझ्यावर महिलेने केलेल्या तक्रारीच्या संदर्भात सर्व पुरावे दाखवले. त्यांनी माझे सर्व म्हणणे ऐपून घेतले, असे किरण माने म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

शरद पवार यांच्यासमोर बाजू मांडली

त्यावर तुमचे म्हणणे ऐकल्यावर शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली, असा प्रश्न पत्रकारांनी किरण मानेंना विचारला,  त्यावर लगेच प्रतिक्रिया देणारे लोक उथळ असतात. शरद पवार  हे सर्व काही शांतपणे ऐकून घेतात, पण ते तुम्हाला खोचक प्रश्नही विचारतात. त्यांनी मलाही दोन-तीन खोचक प्रश्न विचारले. असे प्रश्न विचारून तुम्ही किती पाण्यात आहात ते शरद पवार जोखतात. त्यांच्यासमोर मी माझी बाजू मांडली आहे. आता शरद पवार हे सर्व कशा पद्धतीने मांडतात ते बघूया, असे किरण माने म्हणाले.