प्रसिद्ध मराठी अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

प्रसिद्ध अभिनेते जयंत वाडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मिलिंद सफई यांच्या निधनाची माहिती दिली. जयवंत वाडकर यांनी मिलिंद यांच्या एका फोटो सोबत “अभिनेते मिलिंद सफई यांचं कॅन्सरने निधन…भावपूर्ण श्रद्धांजली”.अशीपोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद सफई हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. पोस्टर बॉईज, प्रेमाची गोष्ट, लकडाऊन, मेकअप अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’, पुढचं पाऊल’, ‘सांग तू आहेस का?’, ‘100 डेज’ या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसेच ‘