
>> नीना कुळकर्णी (ज्येष्ठ अभिनेत्री)
माझी मुलं, त्यांचे सहाय्यक सारे माझ्याकडेच राहायला होते. यातून एकमेकांवरचा विश्वास वढला आणि मनोबलही वाढले.
लॉकडाऊन काळात अनेक गोष्टी करता आल्या. आमच्या सोसायटीत माझ्यापेक्षाही फार ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी आम्ही सोसायटीने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. त्यात दैनंदिन सामान त्यांना घरपोच मिळण्यासाठी नियोजन सोसायटीने केलं होतं. त्याची सुरुवात करणाऱयांपैकी मी एक होते.
या लॉकडाऊन काळात प्रत्येकाने ज्याला जी मदत शक्य आहे ती केली. मीही मला जेवढी शक्य होते तेवढी घरबसल्या या ना त्या प्रकारे मदत करत होते. त्यात घराबाहेर पडता येत नसल्यामुळे मी आर्थिक मदत केली आणि मला वाटतं, प्रत्येक जण काहीना काही मदत करतच होतं, पण या सगळ्यापलीकडे आपण दुसऱयासाठी करतो त्या ऑबिअस गोष्टी असतात, पण त्याचबरोबर घरातलं वातावरण हसतं-खेळतं ठेवणं, निरोगी ठेवणं हेही या काळात महत्त्वाचं होतं. याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न केले आणि त्याचे श्रेय मी माझे मला घेते. कारण इतके महिने घरात राहणं, घराच्या बाहेर अजिबात न पडणं याने खरंच मानसिक आरोग्य बिघडू शकत होतं.
या काळात माझ्या मुलांबरोबरच आमच्या घरी काम करणारं दांपत्य चार महिने माझ्या घरीच राहायला होते. माझी दोन्ही मुलं वर्प फ्रॉम होम करतायत. त्या दांपत्याला लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे राहावं लागलं. माझ्या मुलांबरोबरच त्या दोघांनाही चांगलंचुंगलं खायला देणं याकडे लक्ष देत होते. ते दोघंही चार महिने सातत्याने माझ्या सोबत होते. आमची जेवण करणारी मुलगी गावाला गेली होती, तिचाही आम्ही पगार चालू ठेवला होता, पण हे दांपत्य घर जवळ असूनही जाऊ शकत नव्हते. मुलांना त्यांनी आधीच गावाला पाठवून दिले होते. त्यामुळे ते माझ्याकडे अडकल्यासारखे झाले, पण घरी राहण्यापेक्षा त्यांनी आमच्याकडे राहणं पसंत केलं. मग माझ्या लक्षात आलं की, त्यांच्याकडे कासव आहे. मग त्या कासवालाही आमच्या घरी आणलं. मग आमचे दोन पुत्रे, एक मांजर यात कासवाची भर पडली. दररोज त्यांच्या मुलांशी ते व्हिडीओ का@ल करून बोलायचे. या सगळ्यात त्यांचे मनोबल सांभाळायचे काम मी केले. त्यांना कधीच अंतर दिलेलं नाही. आम्ही जे काही खात होतो, तेच ते खात होते. त्यांना अगदी घरातल्यासारखेच वागवले. ते घरातच राहत होते म्हणून मी आरामात बसले होते असे नाही, तर मी ते काम करताना पंबर कसून किचनमध्ये उभी असायचे. त्यांना असे नको वाटायला की, काम करायला थांबवले. त्याच्यामुळे सगळा स्वयंपाकाचा भार मीच उचलला होता. ती फक्त भाज्या कापून वगैरे द्यायची, पोळ्या करायची. त्यात ड्रायव्हरचे काम पूर्णपणे बंदच होते. तो काही भाजी वगैरे आणायची असल्यास खाली जाऊन आणायचा. बाकी त्यालाही काही काम नव्हते. सुरुवातीच्या काळात मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन असायचे ते मी त्या दोघांनाही ऐकवायचे. त्या दोघांनाही ते ऐकण्याची एवढी आवड निर्माण झाली की, ते विचारायचे आज कोण मार्गदर्शन करणार आहेत ताई? एवढी त्यांना ते ऐकण्याची रुची निर्माण झाली होती.
मी आता रोज कामं करत नाही. रोज उठून जाणं मला जमणारही नाही. सध्या मी शॉर्टफिल्म, फिल्म करते. त्याची किंमत कळायला लागली. माझ्याकडे काम करणाऱया लोकांची किंमत मला आधीपासून होतीच. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला मी सुरुवात केलेली आहे. विचारपूर्वक काही गोष्टी घेणं. कारण घरात किती वेळ थांबणार? ज्येष्ठ म्हणत म्हणत अकाली म्हातारे होता. एरवी आम्ही खूप जोरात काम करत होतो, पण आता कामात एक नेटकेपणा आलाय. जगण्याची किंमत कळायला लागली. आतापर्यंत आपण छान जगलो, त्याची किंमत आपण विसरलो होतो. प्रत्येक गोष्टीचे महत्त्व समजायला लागले हे मात्र नक्की.



























































