दार परत उघडणार; एकच आवाज घुमणार

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱया सिजनची चाहते आतुरतेने वाट पाहतायत. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ‘बिग बॉस’ या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी आज सोशल मीडियावरून ‘बिग बॉस-3’ची घोषणा केली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शोचा टिझर सोशल मीडियावरून शेअर करत ‘‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस मराठी-3’’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे यंदा बिग बॉसच्या घरात कोण सेलिब्रेटी असणार, बिग बॉसचे घर यंदा कसे असणार, खेळात कोणते नवीन नियम असणार याची आतापासूनच सर्वांना उत्सुकता लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या