भरत जाधवचा ‘लंडन मिसळ’ लवकरच

अभिनयाच्या क्षेत्रात चौफेर फटकेबाजी करणारा भरत जाधव आता ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट घेऊन आले आहेत. यात भरत जाधव एका हटके भूमिकेत दिसणार आहे. जालिंदर पुंभार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही केले आहे. चित्रपटाची पटकथा व संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. हिंदुस्थानात व लंडनमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव यांच्यासह ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे, सुनील गोडबोले आदी कलाकारांनी काम केले आहे.