मराठी फिल्मफेअर पुरस्कार; आनंदी गोपाळ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ’आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने तब्बल 11 पुरस्कारांवर आपले नाव कोरले असून सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. ’बाबा’ या चित्रपटासाठी दीपक डोबरियाल सर्वोत्कृष्ट अभिनेता तर ’स्माईल प्लीज’ या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ सेलिब्रेटींच्या उपस्थितीत पाचवा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन अमेय वाघ, सिध्दार्थ जाधव आणि मोनिका मूर्ती यांनी केले. वैभक तत्ववादी, मानसी नाईक, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्या परफॉर्मन्सने सोहळ्याची रंगत वाढवली.

आनंदी गोपाळने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री (क्रिटिक्स) हे पुरस्कार देखील पटकावले.

  • सहाय्यक अभिनेता शशांक शेंडे (कागर)
  • सहाय्यक अभिनेत्री नीना कुलकर्णी (मोगरा फुलला)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आदर्श शिंदे (तुला जपनार आहे)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे (क्वेरीडा क्वेरिडा)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) शिवानी सुर्वे (ट्रिपल सीट)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता)  शुभांकर ताकडे (कागर)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकः सलील कुलकर्णी (वेडिंगचा शिनेमा)
आपली प्रतिक्रिया द्या