दुकानांवर मराठी नामफलक लावावेच लागणार, अन्यथा एक लाखाचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुकानांवर मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱयांना तसेच नामफलकावर छोटय़ा अक्षरात मराठी नाव लिहिणाऱयांना आता चाप बसणार आहे. दुकाने व अस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपीत लावण्याबाबतचा अधिनियम लागू झाला असून यापुढे महाराष्ट्रात मराठी नामफलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियम पाळला नाही तर एक लाख रुपयांचा दंड तर दुसऱयांदा उल्लंघन झाल्यास दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

यापूर्वीच्या तरतुदीत 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक लावण्याची तरतूद नव्हती. याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्याबाबतचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले होते.

बार, वाईन शॉपना महापुरुषांची, गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत

मराठी नामफलक अनिवार्य करतानाच या अधिनियमामध्ये दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गडकिल्ल्यांची नावे लिहिता येणार नाहीत, अशी तरतूद या अधिनियमात आहे.