भाषण… भूक… भोजन… आणि भुजबळांचा फोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संमेलनात भोजनाच्यावेळी पहिल्या दिवशी रात्री अजब गोंधळ पाहायला मिळाला. उद्घाटनाच्यावेळी भाषणे लांबली. सकाळपासून आलेले साहित्यप्रेमी प्रतिनिधी, पुस्तक स्टॉलधारक, स्वयंसेवक अशांच्या पोटात कावळे कोकलू लागले. कुपनवरील जेवणासाठी अनेकजण मुख्य मंडपाच्या शेवटी असलेल्या भागात वाट पाहात होते. मात्र भोजन सुविधा सुरू होईना. जेवणं सुरू करून द्या, अशी विनंती तिथे उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना केली.

मात्र भाषणं होत नाही तोपर्यंत भोजन व्यवस्था सुरू करायची नाही, असा निरोप असल्याचं त्यांनी लोकांना सांगितलं. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आयोजकांपैकी ओळखीच्यांना आम्ही फोन लावतो, पण जेवण सुरू करा अशी केली. तर काहींनी थेट भुजबळांना फोन करू का? असा दम देखील दिला.

जेवण आडगावला, कुपनं नाशिकला

साहित्य संमेलनासाठी आलेले साहित्यप्रेमी प्रतिनिधी आणि स्टॉलधारकांची सोय नाशिक शहरात उत्तम ठिकाणी करण्यात आली होती. मात्र जेवणाची सोय ही आडगाव येथे संमेलनस्थळीच होती. अनेकजण थेट संमेलनाच्या ठिकाणी पोहोचले, त्यांना कुपन घेण्यासाठी पुन्हा नाशिक शहरात उतरण्याची सोय केली होती. त्या ठिकाणी जावे लागले. कुपनसाठी एवढे लांब जाण्याऐवजी काहींनी कुपन न घेताच बाहेर पैसे भरून चाट वैगरे खाऊन दिवस ढकलला.