विठ्ठल अभंगांना संगीतसाज

संगीतकार आनंदी विकास यांची 25 गाणी लवकरच…

प्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेली 25 गाणी रसिकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये 21 विठ्ठल अभंग आणि चार भक्तिगीतांचा समावेश आहे. झी. टीव्हीच्या ‘अवघा रंग एक झाला’ कार्यक्रमासाठी या गाण्यांचे शूटिंग नुकतेच सिन्नर येथे पार पडले.

आनंदी विकास यांनी संगीतसाज चढवलेली गाणी मंगेश बोरगावकर, मृदुला तांबे, स्वराली जोशी, सचिन चंद्रात्रे, विश्वास आंबेकर यांनी गायली आहेत. यानिमित्ताने भक्तिगीतांची वेगळी अनुभूती रसिकांना मिळेल, अशा भावना आनंदी विकास यांनी व्यक्त केल्या. ‘अवघा रंग एक झाला’ कार्यक्रमात 15 डिसेंबरपासून या गाण्यांचा आनंद रसिकांना घेता येईल.

आनंदी विकास या मूळच्या नांदेडच्या आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे 500 गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्यांनी संगीत जगतात स्वतःचा ठसा उमटवला आहे. मराठवाडय़ातील पहिल्या महिल्या संगीतकार आहेत.