
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सोहळ्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना ओबीसी आंदोलकांनी घोषणा देत काळे झेंडे दाखवले. या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ‘महायुती सरकार मुर्दाबाद’, ‘छगन भुजबळ झिंदाबाद’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. रामभाऊ पेरकर, शिवाजी गाडेकर, अशोक शेवगण अशी आंदोलकांची नावे आहेत.
हा मराठवाडा मुक्तिसंग्रामातील सेनानींचा अपमान आहे. केवळ प्रसिद्धीसाठी हे केलं जातंय, असे यावर फडणवीस म्हणाले.