घरकुलासाठी अहमदपूर पालिकेवर धडकला मोर्चा

64

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

शहरातील सर्व्हे नंबर चार मधील मौलाअली नगर, मोंढारोड, चारटांगी इंदिरा नगर या पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करून परवानगी द्यावी आणि घरकुलाचा लाभ द्यावा, या मागणीसाठी प्रा. डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

येथील सम्राट मित्रमंडळाच्या वतीने पुढाकार घेवून शहरातील घरकुल धारकांच्या प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात आला. यात प्रामुख्याने शहरात स. नं. 4 वर गेल्या चाळीस वर्षांपासून अतिक्रमण असून अतिक्रमण नियमानूकूल करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करावेत. इंदिरा नगर व चारटांगी येथे नगर पालिकेची जागा असून यावर नागरीकांनी कच्ची घरे करून वास्तव्य केलेले आहेत. त्यांना मान्यता नसल्याने कुठल्याच योजनेत घरकुल मंजूर होवू शकत नाही. त्यामुळे तातडीने येथील जागेचा लाभार्थ्यांना कबालनामा द्यावा, आदी मागण्या आहेत.

इंदिरा नगरपासून मोर्चाची सुरूवात होवून बौध्द नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नगरपालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्रामुख्याने नगरसेवक सय्यद लाल सरवर, डॉ. फूजेल जागीरदार, गफारखान पठाण, जीवनराव गायकवाड, जावेद बागवान, अफरोज पठाण, आकाश सांगविकर, अजय भालेराव, शेख जिलानी, सचिन बानाटे, सय्यद याखूबभाई, सय्यद हाशमभाई, जयराम कोकाटे, युवराज गायकवाड, शरद बनसोडे, आनंद कांबळे, माधवराव चित्ते, शेख अजगर, शेख नजमाबी, संजय लामतूरे, युसूफ शेख, मोहम्मद पठाण आदीसह शेकडो महिला पुरूष यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या