एका महिलेने आपल्या प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला विवाहित होती आणि गेल्या 12 वर्षांपासून ते रिलेशिनशिपमध्ये होते. आपला बॉयफ्रेंड ब्लॅकमेल करत होता म्हणून त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याचे महिलेने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलीगडमध्ये वर्षा या महिलेचे विवेक या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. वर्षाचे लग्न झाले होते तरी तिचे विवेकसोबत विवाहबाह्य संबंध होते. विवेकने वर्षाला लग्नाचे वचन दिले होते. पण नंतर तो लग्न करायला तयार नव्हता. नंतर विवेक वर्षाला ब्लॅकमेल करायला लागला आणि वर्षाकडून पैसे मागायला लागला. या जाचाला वर्षा कंटाळली होती. रविवारी विवेक आणि वर्षा एका हॉटेलमध्ये भेटले. हॉटेलमध्ये दोघे बोलत होते, तेव्हा वर्षाने आपल्या बॅगेतून बॉटल काढली आणि त्यातले अॅसिड विवेकच्या चेहऱ्यावर फेकले. या हल्ल्यात वर्षासुद्धा जखमी झाली आणि हॉटेलच्या एका कर्मचाऱ्यावरही अॅसिड सांडलं. त्यानंतर विवेक तिथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये धाव घेतली. आरोपी वर्षा जखमी झाली होती म्हणून आधी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली.
विवेक या अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही पण यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.