Maruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या

फेस्टिव्हल सीझनमध्ये तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आघाडीची कंपनी Maruti Suzuki आपल्या काही टॉपच्या मॉडेलवर तब्बल 60 हजारांपर्यंत सूट देत आहे. कोरोना काळात खप वाढवण्यासाठी कंपनीने ही शक्कल लढवली आहे. मात्र फायद्याची गोष्ट म्हणजे कंपनी मारुती डिझायर, वागनआर, ऑल्टो 800 सह अन्य कारवर 30 सप्टेंबरपर्यंत सूट देत आहे. वेगवेगळ्या राज्यात ही ऑफर वेगवेगळी असू शकते.

New Dzire 2020

images-1
मारुती सुझुकीची सर्वाधिक विकली जाणारी कार New Dzire (MT) (AMT) वर 40 हजारांपर्यँग बचत होत आहे. यात 10 हजार रुपये कंज्यूमर ऑफर, 25 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 5 हजार पर्यंत स्पेशल सेल्स ऑफर याचा समावेश आहे. डिझायरचे AMT व्हेरिएंट प्रति लिटर 24 किलोमीटर मायलेज देते. दिल्लीत याची एक्स शोरूम किंमत 5,89,000 रुपयांपासून सुरू होते.

Alto 800 (पेट्रोल आणि सीएनजी)

screenshot_2020-09-23-15-46-27-276_com-miui-gallery
मारुती ऑल्टो 800 वर तुम्हाला 38 हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. यात 18000 रुपयांपर्यंत कंज्यूमर ऑफर, 15000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत स्पेशल सेल्स ऑफर ययांचा समावेश आहे. या कारची दिल्लीत एक्स शोरूम किंमत 2,94,800 रुपये आहे.

New WagonR (पेट्रोल आणि सीएनजी)

screenshot_2020-09-23-15-46-34-007_com-miui-gallery
New WagonR कारवर कंपनी 35 ते 40 हजारांपर्यंत सूट देत आहे. WagonR पेट्रोल कारवर 10000 हजारांपर्यंत कंज्यूमर ऑफर, 20000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 5000 हजारांपर्यंत स्पेशल सेल्स ऑफर मिळत आहे, तर सीएनजी कारवर फक्त 15000 रुपयांची कंज्यूमर ऑफर मिळत आहे.

Celerio (पेट्रोल आणि डिझेल)

images-3
मारुती सुझुकीची Celerio कारवर 50 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. या कारवर अन्य काही ऑफर नसल्याचे कंपनीनं सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या