मेरीच्या निवृत्तीची तारीख ठरली, शेवटच्या स्पर्धेत ‘सुवर्ण’ठोसा लगावण्याचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मेरी कोम (बॉक्सिंग)- पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सहा वेळची विश्वचॅम्पियन, पाच वेळची आशियाई चॅम्पियन आणि ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम हिने आपल्या निवृत्तीची तारीख जाहीर केली आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या मेरीने 2020 च्या ऑलिम्पिकनंतर निवृत्त होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या शेवटच्या स्पर्धेत हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून देण्याचा निर्धारही तिने व्यक्त केला आहे. कोलगेटद्वारा आयोजित एका कार्यक्रमामध्ये ती बोलत होती.

मेरी कोम म्हणाली, मी नेहमीच देशाला पदक मिळवून देण्यासाठी माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करते. ऑलिम्पिक क्वालिफायर आणि विश्वचॅम्पियनसाठी मी तयारी सुरू केली आहे. यावेळी मला सुवर्णपदक जिंकायचे आहे. पुढली वर्षी होणाऱ्या टोकिओ ऑलिम्पिकपूर्वी बॉक्सिंग जगताला झुंझावे लागत आहे. लवकरच यावर तोडगा निघेल.

रियो ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम हिने 48 किलोग्राम गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. मेरी पहिल्यांदाच 51 किलो वजनी गट सोडून 48 वजनी कटात आली होती. या स्पर्धेत मेरी कोमने हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून दिले होते. परंतु पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक जिंकून देण्याची मेरीची इच्छा आहे.