मेरी कोम सहाव्या ऐतिहासिक विश्वविजेतेपदासाठी सज्ज होतेय

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

हिंदुस्थानची जेष्ठ महिला बॉक्सर मेरी कोम आता आपल्या सहाव्या ऐतिहासिक मुष्टियुद्ध विश्वविजेतेपदासाठी सज्ज होत आहे. ३५ वर्षीय मेरी कोमला खांद्याच्या दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. पण यंदा नोव्हेंबर महिन्यात दिल्ली येथे आयोजित जागतिक अजिंक्यपद मुष्टीयुद्ध स्पर्धेत ती पुनरागमन साजरे करणार आहे.

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मेरी कोमला जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्धात जेतेपद मिळविण्याचा पूर्ण विश्वास आहे. मेरी कोम म्हणाली की खांद्याच्या दुखापतीने पुन्हा उचल न खाल्ल्यास माझे सहाव्या ऐतिहासिक विश्वविजेतेपदाचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल .त्यासाठी मी सरावाला लवकरच सुरुवात करणार आहे. ती १०० टक्के फिट असल्याचा दावाही तिने केला. युवा महिला मुष्ठीयोद्धयांना गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत आलेल्या अपयशाबद्दल तिने दुःख व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या