मस्जिद बंदरमध्ये इमारतीला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मुंबईच्या मस्जिद बंदर स्थानकाबाहेर एका सहा मजली रहिवासी इमारतीला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली आहे. मात्र, अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून काही वेळातच आग विझवण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मस्जिद बंदर येथील राजगुरू चेंबर ही सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या वीज मीटर बॉक्सला शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी नव्हती, मात्र प्रसंगावधान राखत अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकून पडलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढले.