
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जैश ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले असून पाकिस्तानने मसूदला इस्लामाबादमध्ये सुरक्षित स्थळी हलविल्याचे समजले.
Government Sources: Jaish-e-Mohammed Chief Masood Azhar was put under house arrest at Markaz Subhan Allah in Bahawalpur, post Balakot Attack (26.02.2019) and has been recently shifted to a safe house in Islamabad.
— ANI (@ANI) May 1, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानातील जैशचे मुख्यालय असलेल्या बालाकोटवर एअर स्ट्राईक केला होता. य़ा एअरस्ट्राईकमध्ये जैशचे बरेच दहशतवादी मारले गेले होते. एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने मसूद अजहरला बहावालपूर येथील मरकाझ सुभान अल्लाह भागातील त्याच्या घरात नजरकैदेत ठेवले होते. त्यानंतर आता मसूदला तेथून इस्लामाबादला सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे समजते.
























































