मुंबई एसटी बँकेत संचालकांमध्ये राडा, मिंधे गट आणि सदावर्तेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. या बैठकीत मिंधे गट आणि सदावर्ते गट यांच्यात तुफान हाणामारी झाली आहे. हा हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बैठकीत बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्याने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ही बैठक पार पडली. बैठकीत सदावर्ते पॅनलचे सर्व संचालक आणि मिंधे गटाचे अडसूळ पॅनलचे संचालक उपस्थित होते. यावेळी हा राडा झाला आहे. या बैठकीतील व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, एक संचालक उभे राहून बोलत आहेत की, “ही संचालक मंडळाची बैठक आहे. याचे कोणीही रेकॉर्डिंग करू नये, याचा आऊटपूट बाहेर जाता कामा नये, असं वर्तन कुणीही करू नये.” यानंतर बैठकीत राडा सुरु झाल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे, की संचालक हाणामारी करत एकमेकांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकतात. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)