माथेरान येथे 800 फूट खोल दरीत कोसळून महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। माथेरान

माथेरान येथे फिरावयास आलेल्या एका महिला पर्यटकाचा बेल्व्हीडियर पॉईंटवरून कोसळून मृत्यू झाला आहे. गीता मिश्रा असे या महिलेचे नाव असून त्या मुंबईच्या आहेत. पती व दोन मुलींसह त्या माथेरानला फिरायला आल्या होत्या.

बेल्व्हीडियर पॉईंट येथे  दगडाची ठेच लागल्याने त्यांचा तोल गेला व त्या आठशे फूट दरीत कोसळल्या. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती व लहान दोन मुली व एक मित्र होता.

दरम्यान, स्थानिक पोलीस व माथेरान मधील सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी खोल दरीत उतरून तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गीता यांचा मृतदेह वर आणला.