‘मधुबन में राधिका नाचे’ गाण्यावर सनीचा अश्लील डान्स, साधू संत भडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी पॉर्न अभिनेत्री सनी लिओनी हिचे एक गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. मधुबन में राधिका नाचे असे त्या गाण्याचे बोल असून त्या गाण्यावर सनी लिओनी सेक्सी कपड्यांमध्ये नाचताना दिसत आहे. त्यावरून मथुरेतील साधू संत भडकले असून त्यांनी या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या गाण्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे या साधू संतांचे म्हणने आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी लिओनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या या मधुबन अल्बमचे प्रमोशन करत आहे. मात्र आता हे गाणे रिलीज झाल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या गाण्याला गायिका कनिका कपूर व गायक अरिंदम चौधरी यांनी आवाज दिला आहे. तर प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी याची कोरियोग्राफी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

मात्र हे गाणे रिलीज होताच मथुरा वृंदावन मधील साधू संत भडकले आहेत. गाण्याचे बोल हे हिंदू धर्माच्या आस्थेशी जोडलेले आहेत व त्यावर सनी लिओनी अश्लील डान्स करत आहेत. त्यामुळे हिंदू धर्मिंयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या गाण्यावर तत्काळ बंदी आणावी, अशी मागणी वृंदावनमधील संत नवल गिरी महाराज यांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

‘जर सरकारने अभिनेत्री विरोधात कारवाई नाही केली. जर तिच्या व्हिडीओवर बंदी नाही आणली तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू. तसेच सनी लिओनीने या व्हिडीओसाठी जाहीररित्या माफी मागावी’, असे नवल गिरी महाराज यांनी पीटीआयला सांगितले आहे.