
सामना ऑनलाईन । मुंबई
आज मध्य रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजे पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गाड्या गंतव्य ठिकाणी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील असेही मध्य रेल्वेने नमूद केले आहे.
दिनांक २४.२.२०१९ रोजी मेगा ब्लॉक.
माटुंगा – मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.२० वा. पासून दुपारी ०३.५० वा. पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वा. पासून दुपारी ४.१० वा. पर्यंत. pic.twitter.com/I6Pt38zB9G— Central Railway (@Central_Railway) February 23, 2019
सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कर्जत आणि खोपोली दरम्यान इन्फ़्रास्टक्चर अपग्रेड ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मध्य रेल्वेकडून काही लोकल रद्दही करण्यात आल्या आहेत.
दिनांक २४.२.२०१९ रोजी सकाळी ०९.०० वा. पासून दुपारी ०2.०० वा. पर्यंत कर्जत आणि खोपोली दरम्यान इंफ्रास्ट्रक्चर अपग्रेड ब्लॉक. pic.twitter.com/J0hQh3yRFb
— Central Railway (@Central_Railway) February 23, 2019
























































