
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
12 ऑगस्टला देशभरामध्ये मुस्लिम धर्मातील सण ईद अल-अधा साजरा केला जाणार आहे. या दिवशी जनावरांचा बळी देण्याची प्रथा आहे. या संदर्भात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना के.आर फिरंगी महाली यांनी वक्तव्य केले असून सरकारकडून बंदी नसलेल्या जनावरांचाच ईदच्या दिवशी बळी द्या असे आवाहन मुस्लिम धर्मियांनी केले आहे.
मी सर्व मुस्लिम धर्मियांना आवाहन करतो की ईद अल-अधाच्या दिवशी दरवर्षीप्रणाणे या वर्षीदेखील अशा प्राण्यांचा बळी द्या ज्यांच्यावर सरकारने बंदी घातलेली नाही, असे महाली म्हणाले. यावेळी त्यांनी जनावरांचा बळी रस्त्यावर न देता घरात किंवा मदरशामध्ये द्या, जेणेकरून इतर समुदालाया कोणतीही अडचण येणार नाही, असेही आवाहन केले. तसेच बळी देतानाचा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
Maulana KR Firangi Mahali: Animal sacrifice must not be done on roads; it can be done inside a house or a madrasa so that other communities do not face any problem. No photos of animal sacrifice should be clicked or shared on social media. https://t.co/iHdcB3cZjU
— ANI (@ANI) August 4, 2019



























































