मावळ युवासेनेचा दणका! खाजगी आयटीआय संस्थेने विद्यार्थ्यांचे थकविलेले डिपॉझिट केले परत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लोणावळा

भुशी ( लोणावळा,ता.मावळ ) येथील आयटीआय संस्थेने विद्यार्थ्यांचे थकविलेले डिपॉझिट अखेर युवा सेनेच्या दणक्याने परत दिले. भुशी येथील खाजगी आयटीआय संस्थेने विद्यार्थ्यांचे डिपॉझिट शैक्षणिक वर्ष संपले तरी परत केले नव्हते. मावळ लोकसभा युवा सेना विस्तारक,मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य वैभव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भुशी लोणावळा येथील खाजगी आयटीआय संस्थेला युवा सेनेच्या वतीने यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.

युवा सेनेच्या दणक्याने संस्थेने विद्यार्थ्यांचे थकविलेले डिपॉझिट परत दिले असून युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. युवा सेनेचे मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, कुसगाव विभाग युवती सेना अधिकारी काजल शेख, उपविभाग अधिकारी स्नेहल शेवाळे, वाकसई भारतीय विद्यार्थी सेना विभाग संघटक नितिन देशमुख, तारिश रानवे, युवा सेनेचे रोशन येवले, निखिल चांदणे यांनी या संदर्भात संस्थेच्या प्राचार्यांना निवेदन दिले होते.