…तर पाठिंबा काढणार, कमलनाथांना मायावतींची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनऊ

मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार स्थापन होऊन एक महिनाही पूर्ण झाला नाही तेच बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना दिलेला पाठिंबा काढून घेण्याची धमकी आज दिली. मायावती यांनी बसपाच्या दोन आमदारांचा पाठिंबा तेथील काँग्रेस सरकारला दिलेला आहे.

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रभावहीन करण्याच्या विरोधात 2 एप्रिल रोजीच्या ‘हिंदुस्थान बंद’ वेळी राजस्थान, मध्य प्रदेशातही दलितांचे आंदोलन झाले होते. त्यावरून दलित आंदोलकांवर भरण्यात आलेले खटले त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी मायावती यांनी कमलनाथ यांच्या सरकारकडे केली आहे. आमची ही मागणी मान्य केली गेली नाही तर बसपाने काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा निरर्थक ठरेल. मध्य प्रदेशात सरकारला बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर आम्हाला फेरविचार करावा लागेल, असे मायावती यांनी सांगितले.