Mayonnaise – मेयॉनिज हे शाकाहारी असते का मांसाहारी ?

आजकाल खाद्यपदार्थांमध्ये मेयॉनिज वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे.  पोटॅटो बाईट्स, मोमोज, रोल्स, कबाब, स्नॅक्स, टिक्की, सँण्डविच अशा अनेक पदार्थांमध्ये मेयॉनिज वापरले जाते.  पोळी, बर्गर, फ्रेंच फ्राईज, व्हाईट पास्ता, मॅगी अशा आपल्याला आवडेल त्या पदार्थात मेयॉनिज वापरता येते. बाजारात मेयॉनिज उपलब्ध असल्याने हॉटेलप्रमाणे घरामध्येही त्याचा वापर वाढला आहे.  हे मेयॉनिज शाकाहारी असतं की मांसाहारी असतं ? हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.  बहुसंख्या लोकांना असं वाटतं की मेयॉनिज हे अंड्याचा वापर करून तयार केले जाते. ही बाब खरी आहे का खोटी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हॉटेलमध्ये किंवा दुकानामध्ये मिळणारं मेयॉनिज हे तुम्ही घरच्या घरीही सहजपणे बनवू शकता. आणि याला फार वेळही लागत नाही. 15 ते 20 मिनिटांमध्ये मेयॉनिज तयार करता येते.  काहींचा समज असतो की मेयॉनिज हे दुधापासून आणि सायीपासून बनवितात.  काहींना वाटतं की मेयॉनिज हे दूध आणि अंड्याचा वापर करून तयार करण्यात येतं.  मेयॉनिज शाकाहारी का मांसाहारी याबाबत ‘Quora’ या प्रश्नोत्तरांच्या  संकेतस्थळावर प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर संकल्प पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

बऱ्याचशा हॉटेलमध्ये मिळणारे मेयॉनिज हे अंड्याचा वापर करून तयार करण्यात आलेलं असतं.  मांसाचा मात्र मेयॉनिज बनविण्यासाठी वापर केला जात नाही. संकल्प पाटील यांनी म्हटलंय की मेयॉनिज हे दोन्ही पद्धतीने बनविता येते म्हणजेच ते शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीने बनविता येते.

संकल्प यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलंय की बाजारात विकत मिळणाऱ्या मेयॉनिजमध्ये शुद्ध शाकाराही मेयॉनिज हे विबा कंपनीचे उपलब्ध आहे. 275 ग्रॅमचा पाऊच हा 135 रुपयांना उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय. खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर किंवा खोक्यावर शाकाहारी असल्यास चौकोनात हिरवा गोळा तर मांसाहारी असल्यास चौकोनात लाल रंगाचा गोळा छापलेला असतो.  इतर कंपन्यांचे मेयॉनिज घेतानाही ग्राहक वेष्टणावर कोणत्या रंगाचा गोळा आहे हे पाहून खरेदी करू शकतात.

संकल्प पाटील यांचं म्हणणं आहे की बाहेरून मेयॉनिज विकत आणण्यापेक्षा ते घरीच केलेलं कधीही चांगलं.  मात्र विनासायास हवं असंल तर बाहेरून विकत आणण्याशिवाय पर्याय नाही. संकल्प यांनी म्हटलंय की मेयॉनिज जास्त खाणं हे तब्येतीसाठी अपायकारक ठरू शकतं.  मेयॉनिजमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. क्रीम,साखर,अंड्यापासून बनविलेल्या मेयॉनिजमध्ये या जिन्नसांचा वापरही मुबलक प्रमाणात केलेला असतो. महिन्यातून 2-3 वेळा मेयॉनिज खाणं ठीक आहे, मात्र रोज खाल्ल्यास त्याचा प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो असं संकल्प पाटील यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या