मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात, शिवशक्ती, स्वराज्य स्पोर्टस्ची विजयी चढाई

85

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली. महिला गटात शिवशक्ती, स्वराज्य स्पोर्टस् , जय हनुमान, राजमाता जिजाऊ या संघांनी तर पुरुष गटात न्यू इंडिया ऍश्युरन्स, देना बँक, महिंद्रा, मुंबई बंदर, युनियन बँक यांनी प्रतिस्पर्ध्याना हरवत विजयी सलामी दिली. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई शहर कबड्डी असोसिएशन व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यावर करण्यात आले आहे.

महिलांच्या ब गटात उपनगरच्या स्वराज्य स्पोर्टस्ने ठाण्याच्या होतकरू मंडळाला 35-20 असे पराभूत केले. अंजली रोकडे, श्रुतिका घाडीगावकर, सिद्धी ठाकूर यांच्या चतुरस्र खेळाने पहिल्या डावात 23-8 अशी आघाडी घेणाऱया स्वराज्यला दुसऱया डावात मात्र कडवी लढत मिळाली, पण पहिल्या डावातील आघाडी मात्र होतकरूला कमी करता आली नाही. याच गटात शिवशक्ती मंडळानेदेखील होतकरूला 37-7 असे लोळवले. सोनाली शिंगटे, ऋतुजा बांदिवडेकर यांनी ठसा उमटवला.

आपली प्रतिक्रिया द्या