वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘कोविड सुरक्षा कवच’

exam_prep
प्रातिनिधिक फोटो

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘कोविड सुरक्षा कवच’ देण्याचा निर्णय आरोग्य विद्यापीठाने घेतला आहे. या योजनेनुसार पदकीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना कोरोना बाधित झाल्यास उपचारासाठी एक लाख व मृत्यू झाल्यास कुटुंबियांना रुपये तीन लाख रक्कम देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाने या योजनेस मंजुरी दिली आहे.

यापूर्की आरोग्य विद्यपीठाने परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. 45 दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने आरोग्य विद्यापीठाने सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना ‘कोविड सुरक्षा कवच’ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवीपूर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाजवळचे त्यांच्या अभ्यासक्रमाचे महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची संधी विद्यापीठाने दिली आहे. तसेच विद्यार्थी तो शिकत असलेल्या महाविद्यालयातच परीक्षा देऊ शकतात.

पदवीपूर्क सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास करु नये या उद्देशाने त्यांच्या घराजवळच्या महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्रम द्यावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. विद्यार्थांनी पसंतीक्रम त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत विद्यापीठास 14 जुलै पर्यंत पाठवावा. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या