दीर्घायु भव प्राणधारणा

>> अभिजित कुळकर्णी  (योगशिक्षक, भारतीय योग मंदिर)

श्वासोच्छ्वास हा बहुधा आपल्यामधील प्राणशक्तीचा सर्वात जवळचा अविष्कार आहे आणि म्हणूनच मनामध्ये ईश्वराप्रति श्रद्धा आस्तिक्य भाव असावा. यालाच ईश्वरप्रणिधान’  असेही म्हणतात. प्राण या शब्दाचा एक अर्थ आहे, श्वास आणि धारणा म्हणजे एकाग्रता म्हणून प्राणधारणा म्हणजे श्वासोच्छ्वासावरती आपले मन एकाग्र करण्याचा अभ्यास होय.

वायुतत्त्व हे पृथ्वी, जल आणि तेज यांपेक्षाही सूक्ष्म आहे, कारण ते दृग्गोचर नाही, दिसत नाही, पण याचा स्पर्श मात्र आपल्याला जाणवतो आणि म्हणूनच चौथ्या स्तरावर वायुतत्त्वाचा आधार मनाच्या एकाग्रतेसाठी घ्यावा. बहुतेक सर्वच योगवर्गामध्ये योगशिक्षक आसनाचा अभ्यास करताना योगसाधकांना आपल्या श्वासोच्छ्वासावरती अर्थात वायुतत्त्वावरती लक्ष पेंद्रित करायला सांगतात.

डोळे बंद केल्यावर आपल्या श्वासोच्छ्वासावर मन एकाग्र करावे. प्रत्येक उच्छ्वासाबरोबर आपल्या मनातील विचारांचा, नकारात्मकतेचा, हीन भावनांचा निचरा होऊ द्यावा. प्रत्येक श्वासाबरोबर आपण ईश्वरी चैतन्य, ऊर्जा आणि उत्साह आपल्या शरीरात, मनात भरत आहोत अशी धारणा ठेवावी. पुन्हा श्वासोच्छ्वासावरती लक्ष पेंद्रित करावे. हळूहळू आपले मन शांत स्थिर होत जाते. या स्थिरतेचा शांतीचा अनुभव घ्यावा.

श्वासोच्छ्वास करताना हवा आपल्या नाकपुडय़ांतून घर्षण करीत श्वसनलिकेत शिरते, तेव्हा तिथे हवेचा स्पर्श आपण अनुभवू शकतो, मात्र यासाठी मन एकाग्र करावे लागते. घर्षण झाल्याने एक ध्वनी निर्माण होतो, नीट लक्ष दिल्यास आपण हा ध्वनी ऐकू शकतो. श्वास घेताना होणारा आवाज हा  ‘सो’  आणि उच्छ्वासाबरोबर होणारा आवाज हा  ‘हं’ असा ऐकू येतो. या सोएहम् ध्वनीवर ध्यान पेंद्रित करावे.

एक सूचना बरेच वेळा असे म्हटले जाते की, ध्यान करताना आपले भान हरपून जाते, परंतु माझ्यामते भान हरपले की, मन भरकटते आणि म्हणून भान हरपू देण्यापेक्षा मन सजग ठेवणे हे महत्त्वाचे आहे.

योग साधना करणारे योगी, मुनी, महर्षी नित्य ओंकाराचेच ध्यान करत असतात. विश्व निर्मितीच्या प्रारंभी एक ध्वनी उत्पन्न झाला तो ध्वनी म्हणजे ॐ आणि म्हणूनच ओमकार हे ईश्वराचे सर्वप्रथम नाम आहे.

 नादानुसंधान

 पुढचा टप्पा म्हणजे सर्वात सूक्ष्म अशा सर्वव्यापी, अपार, अनंत, निराकार अशा आकाश तत्त्वावर ध्यान पेंद्रित करणे. हे तत्त्व सर्वात सूक्ष्म आहे, ईश्वराप्रमाणेच चराचरात भरलेले आहे. संपूर्ण विश्व यातच सामावलेले आहे, पण आपल्याला आकाश तत्त्वाची अनुभूती मात्र बहुधा होत नाही. निराकार, अदृश्य, स्पर्शरहित, गंधरहित असल्याने त्यावरती ध्यान पेंद्रित करणे हे अत्यंत कठीण आहे. मग काय करावे?

आपल्या शास्त्र्ाात सांगितल्याप्रमाणे आकाश तत्त्वाची तन्मात्रा आहे, शब्द अर्थात ध्वनी आणि या टप्प्यात आपण ध्वनीवर आपले ध्यान पेंद्रित करावे. प्राणधारणा करून मन थोडे स्थिर झाले की, श्वासोच्छ्वासाच्या सोहम ध्वनीवर ध्यान पेंद्रित करावे. या सोहम् नादलहरीमध्ये आपल्या विचारांचा विलय झाला की, मन आणखी अंतर्मुख करावे आणि आपल्या हृदयावर ध्यान स्थिर करावे. आपल्या हृदयाची धडधड सतत सुरू असते. मन शांत असल्यास आणि एकाग्र केल्याने हृदयाचा सतत चालू असलेला अनाहत ध्वनी आपण स्टेथोस्कोप शिवायही ऐकू शकतो.

हा ध्वनी अतिशय नियमित तालावर चालू असतो,  या लयीवर आपल्या मनातील विचारांचा विलय होऊ द्यावा. मन भरकटल्यास पुन्हा ताळय़ावर आणावे. पुन्हा हृदयाच्या धडधडीवर लक्ष पेंद्रित करावे. हे आपल्या जीवनाचे संगीत आहे. ते आनंदी अंतःकरणाने ऐकावे. त्यामध्ये तल्लीन व्हावे. नाद म्हणजे आवाज, नाद म्हणजे ध्वनी या नाद तत्त्वातूनच आकाशतत्त्व निर्माण झाले. या नादावर लक्ष साधणे म्हणजे नादानुसंधान.