शहीद श्रीजित, अनिल कुमार तोमर यांच्यासह सहा जवानांना शौर्यचक्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यचक्रसह लष्करातील 316 जणांना विविध पदके जाहीर झाली आहेत. शांततेच्या काळातील तिसरा सर्वोच्च सन्मान ‘शौर्यचक्र’ देशासाठी बलिदान देणाऱ्या पाच शहीद जवानांसह सहा जणांना प्रदान करण्यात येणार आहे.

शहीद नायब सुभेदार श्रीजित एम, शहीद हवालदार अनिल कुमार तोमर, शहीद हवालदार काशिराय बम्मानल्ली, शहीद हवालदार पिंकू कुमार, शहीद शिपाई मारुप्रोलू जसवंतकुमार रेड्डी या पाच जणांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ प्रदान करण्यात येणार आहे. आसाम रायफल्सचे जवान राकेश शर्मा यांनाही ‘शौर्यचक्र’ जाहीर झाले आहे.

परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त झालेल्यांमध्ये लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, लेफ्टनंट जनरल योगेशकुमार जोशी यांचा समावेश आहे. चार जणांना उत्तम युद्ध सेवा पदक, 33 लष्करी अधिकाऱयांना अतीविशिष्ट सेवा पदक, 10 लष्करी अधिकाऱयांना युद्ध सेवा पदक, 81 जणांना सेना पदक जाहीर झाले आहे.