तिन्ही रेल्वे मार्गांवर ’मेगा’हाल

उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉकमुळे लोकल सेवेच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकल ट्रेन जवळपास 20 ते 30 मिनिटे उशिराने धावल्या. तसेच अनेक गाडय़ा रद्द केल्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. बहुतांश स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान, हार्बर लाईनवर पुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. या काळात अनेक गाडय़ांचे मार्ग बदलल्यामुळे तसेच अनेक फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. पुटुंबीयांसोबत घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला.