मध्य आणि हार्बरवर आज मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ठाणे-कल्याण आणि हार्बरवर कुर्ला-वाशी दरम्यान उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. ठाणे-कल्याण दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 9 ते दुपारी 1 दरम्यान ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सर्व अप-डाऊन मेल आणि एक्सप्रेस गाडय़ा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे जलद मार्गावरील अनेक लोकल गाडय़ा रद्द करण्यात येणार केल्या आहेत. तसेच सर्वच गाडय़ा 15-20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीकडे जाणाऱया हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी, बेलापूर, पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱया अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.