तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल- दुरुस्तीच्या कामांसाठी रविवार, 26 नोव्हेंबर रोजी पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर रेल्वेच्या पनवेल-वाशी अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.14 ते दुपारी 3.09 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱया धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येईल आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4. 30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी या मार्गावर दिवसाकालीन ब्लॉक नसणार आहे.