मध्य आणि हार्बरवर उद्या मेगाब्लॉक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेच्या उपनगरीय लोकल मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील कमांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे अप आणि डाऊन पाचव्या–सहाव्या मार्गिकेवर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱया आणि येथे येणाऱया एक्स्प्रेस गाडय़ा ठाणे आणि विद्याविहारदरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी जलद मार्गावरील गाडय़ा विलंबाने धावणार आहेत. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर, वाशी अप–डाऊन मार्गावरील लोकल रद्द असणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी–कुर्ला आणि पनवेल–वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.