मेहबुबा मुफ्तींची धमकी, जम्मू–कश्मीरचे तुकडे करण्याची चूक सुधारा अन्यथा फार उशीर होईल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
कलम 370 वरून जम्मू कश्मीरला देशापासून वेगळे करण्याची भाषा करणाऱ्या पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना जम्मू कश्मीरच्या जनतेने नाकारले आहे.

जम्मू-कश्मीरचे तुकडे तुकडे केलेत. ही चूक सुधारा, अन्यथा फार उशीर होईल. कश्मीरमधील लोकांचे धैर्य समाप्त होईल त्या दिकशी तुम्ही पराभूत क्हाल, अशी धमकीच पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी तालिबानचे उदाहरण देत मोदी सरकारला दिली.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा हकाला देत जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र्ा सोडले. एका क्यासपीठाकरून जाहीरपणे बोलताना मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘मी कारंकार सांगत आहे की आमची परीक्षा घेऊ नका! सुधारा, सांभाळा शेजारी पाहा काय होतंय. एकढी मोठी शक्ती अमेरिका, त्यांनादेखील तिथून सामान बांधून परत जाके लागले. तुम्हाला अजूनही संधी आहे.’

ज्याप्रकारे काजपेयींनी जम्मू-कश्मीरमध्ये चर्चा सुरू केली होती त्याचप्रमाणे तुम्हीदेखील चर्चा सुरू करा आणि जे तुम्ही लुटले आहे, बेकायदेशीरपणे जे जम्मू-कश्मीरचे चित्र तुम्ही खराब केले आहे. जम्मू-कश्मीरचे तुकडे तुकडे केलेत. ही चूक सुधारा अन्यथा फार उशीर होईल, असे सांगत मेहबुबा मुफ्ती यांनी कश्मीरला किशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली.

ही काय करू शकणार असे समजू नका!

‘असे काटत असेल की आम्ही फार छोटे आहोत. ही काय बडबडते आहे? ही काय करू शकणार? मात्र कधी कधी एखादी मुंगी जेक्हा हत्तीच्या सोंडेत शिरते तेक्हा ती त्याचे जगणे कठीण करते.’ असेदेखील मुफ्ती जम्मू-कश्मीरमधील कुलगाममध्ये बोलताना म्हणाल्या.