मेहबुबा मुफ्तींचे फुटीरवाद्यांशी संबंध! गृह मंत्रालयाचे सहा पानी डोजियरमध्ये स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी फुटीरवाद्यांसोबत काम केले. याच संबंधावरून त्यांच्याविरोधात सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) गुन्हा दाखल करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सहा पानी डोजियरमध्ये म्हटले आहे. 5 ऑगस्टला कलम 370 हद्दपार केल्यानंतर तसेच राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी झाल्यानंतर सरकारच्या या धोरणांविरोधात मुफ्ती यांनी जाहीररीत्या टीका केली, असेही डोजियरमध्ये नमूद केले आहे.

कलम 370 आणि 35(ए) हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर मुफ्ती यांनी भडक प्रतिक्रिया दिली होती. जर कोणत्या हातांनी 35(ए) कलमाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्या हातांबरोबरच पूर्ण शरीर जळून खाक होईल, असे मुफ्ती म्हणाल्या होत्या. इतर लोकांच्या बाबतीत ‘लिचिंग’ आणि ‘हायवे ब्लॉक’ तसेच मेहबुबा मुफ्ती यांनी कलम 370 संदर्भात केलेले ट्विट या सर्व बाबी गृह मंत्रालयाच्या डोजियरमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. याआधी नॅशनल कॉन्फरन्सचे सरचिटणीस तथा माजी मंत्री अली मोहम्मद सागर आणि पीडीपीचे ज्येष्ठ नेते सरताज मदनी यांच्यावरही पीएसएचा उगारण्यात आला आहे.

जम्मू-कश्मीरातील कलम 370 हटवताच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत वण्यात आले. सहा महिन्यांनी नजरकैदेतून सुटका होण्याच्या काही तास आधी मुफ्ती यांच्याविरोधात ‘पीएसए’अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.