मेहेरबाबांच्या सप्तरंगी ध्वजाचे अनावरण करून जन्मोत्सवास सुरुवात

382

नगरमधील सरोष पेट्रोलपंपाशेजारील मेहेरबाबा नगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबांच्या 126 वा जन्मोस्तव कार्यक्रमची सुरुवात सोमवारी सकाळी रमाबाई कलचुरी यांच्याहस्ते सप्तरंगी ध्वजाचे अनावरण करून करण्यात आली. यावेळी अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर, केंद्राचे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी, उपाध्यक्ष वैभव जोशी, दीपक थाडे, राहुल मुळे, मधुकर डाडर, नीलिमा औटी, नितीन थाडे, व्ही. जी. ढेपे, माधुरी मिसाळ, डॉ. प्रीती नाईक, वंदना बोगावात यांच्यासह देश विदेशातील मेहेरप्रेमीं उपस्थित होते.

कलचुरी यांनी यावेळी ध्वजाचे महत्व सांगितले. ते म्हणाले बाबांना त्याची लोक, मंडळी म्हणाली आपल्या आध्यात्मिक मिशनसाठी पवित्र चिन्ह, ध्वज आपल्याला पाहिजे तेव्हा प्रत्येकाने आपल्या धर्माप्रमाणे भगवा, हिरवा, पांढरा आदी रंगाचा असावा अशी मागणी केली. तेव्हा मेहेरबाबांनी सांगितले आपला सप्तरंगी ध्वज असेल त्यात सर्व ब्रम्हांड सामाऊन जाईल. कलचुरी पुढे म्हणाले ध्वजाचे खरे महत्व म्हणजे सात रंग म्हणजे सात संस्कार-विकार सोडणे आहे. काम, क्रोध, लोभ, मोह,मद, मत्सर, अहंकार हे सात विकार सोडणे रंग रहित राहणे म्हणजे संस्कार होय. आत्मा हा रंगविरहित असतो. त्यामुळे बाबांनी हे रंग निवडले आत्मा हा परमात्म्यात एकरूप होतो व शुद्ध होतो असे ते म्हणाले. यावेळी चेअरमन केळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. नंतर भजन, आरती, प्रार्थना होऊन उपस्थितांना प्रसाद देण्यात आला. आजपासून सुरु झालेला हा जन्मोत्सव तो 1 मार्चपर्यंत चालणार आहे. यामध्ये अवतार मेहेरबाबा यांचा जन्मोत्सव सोहळा होणार आहे. याप्रसंगी विविध कार्यक्रम होणार आहेत. नगरसह देश-विदेशातील भाविक यावेळी गीते सादर करतील. तर बाबा कार्याविषयी प्रवचनही देणार आहेत. नंतर आरती प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता होईल. नगरमधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील मेहेरबाबा नगर केंद्रामध्ये दररोज होणाऱ्या कार्यक्रमाचा नगरकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सेंटरच्या सदस्यांनी, मेहेरप्रेमींनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या