मानसिक रुग्णांना क्वारंटाईनमध्ये करावा लागतोय अवघड स्थितीचा सामना

332

”कोरोना व्‍हायरसच्‍या वाढत्‍या धोक्‍यामुळे वेगळे ठेवण्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍तींमध्‍ये भितीचे वातावरण पसरत आहे. मुख्‍यत्‍वे सामाजिक अंतर आणि मित्र-परिवारापासून वेगळे ठेवण्‍यात आल्‍याने ही भिती निर्माण झाली आहे. अशा प्रकारची भिती व सामाजिक अंतरामुळे लोक त्‍यांनी केलेल्‍या प्रवासाबाबतची माहिती लपवून ठेवत आहेत. तसेच चिंता व अनिश्चितता लोकांना अत्‍यंत संकोचित करण्‍यासह फक्‍त वर्तमान आणि स्‍वत:बाबतच विचार करण्‍यास भाग पाडत आहेत. ज्‍यामुळे ते सरकारने अनिवार्य केलेल्‍या क्‍वारंटाइनला वगळत आहेत, असे मसिना हॉस्पिटल येथील कन्‍सल्‍टण्‍ट मानसोपचारतज्ञ डॉ. नताशा काते यांनी सांगितले.

सरकारने सोशल डिस्‍टन्सिंग राखण्‍याच्‍या उद्देशासह घोषित केलेल्‍या तात्‍पुरत्‍या शटडाऊनमुळे अनेकांना स्‍वयं क्‍वारंटाइन करावे लागत आहे. काही लोकांनी या स्थितीशी जुळवून घेतले असले तरी पूर्वीपासूनच मानसिक आरोग्‍यविषयक समस्‍या असलेल्‍या अनेक लोकांना क्‍वारंटाइनमध्‍ये राहताना अवघड स्थितीचा सामना करावा लागत आहे. ज्‍यामुळे त्‍यांच्‍यावर ताण वाढत त्‍यांचे मानसिक आरोग्‍य अधिक खालावत आहे. आयसोलेशन किंवा क्‍वॉरंटाइनमध्‍ये असताना आरोग्‍यदायी जीवनशैलीवर भर देण्‍यासाठी व्‍यायाम आणि चिंतन किंवा योगा केल्‍याने मानसिक तणाव कमी होण्‍यामध्‍ये मदत होईल. तणावाव्‍यतिरिक्‍त लोकांना या आजारासाठी कोणतीच लस नसल्‍याच्‍या अनिश्चिततेबाबत, तसेच सध्‍यातरी कोणतेच प्रभावी उपचार नसल्‍याबाबत आणि परिस्थिती कधी सुरळीत होईल याबाबत चिंता आहे. मसिना हॉस्पिटलमध्‍ये आम्‍ही अधिक चिंता व भितीच्‍या केसेस पाहिल्‍या आहेत. यामुळे विकृती अधिक वाढताना दिसण्‍यात आले आहे. काही रूग्‍णांना त्‍यांचे मास्‍क्स परिधान करून दीर्घकाळापर्यत झोपण्‍याबाबत, तसेच प्रत्‍येक गोष्‍टीला सॅनिटाईज करण्‍याबाबत आणि सोशल व इतर मीडियावर दिवसभर कोरोना व्‍हायरसविषयी वाचत राहण्‍याबाबत देखील चिंता आहे. ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांचे एकूण आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍यासंदर्भात तडजोड करावी लागत आहे.” असे डॉ. नताशा काते यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या