मेफेड्रोन तस्कर शेरखान गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या शेरखान अजीम खान याला क्राईम ब्रँच युनिट 11 ने गोरेगाव परिसरातून अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 44 हजाराचे मेफेड्रोन जप्त केले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी बांगूरनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी रात्री क्राईम ब्रँचचे पथक गोरेगाव बस डेपो परिसरात गस्त करत होते. त्यांना पाहून शेरखान हा पळू लागल्याने पोलिसांचा संशय बळावला.