
सामना प्रतिनिधी । मुंबई
नाल्यात कचरा टाकणाऱ्यांचे पाणी कापण्याचा इशारा दिला असताना आता पालिकेने कचरा टाकणाऱ्यांना पकडण्यासाठी नाल्यात लोखंडी ग्रील, जाळ्या बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये ज्या ठिकाणी कचरा आढळेल त्या परिसरात चौकशी करून पाणी कापणे आणि पोलीस कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, नाल्यात कचरा टाकणाऱयांकडून गेल्या आठवडाभरात तीन लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे.
नाल्यामध्ये कचरा टाकल्यामुळे मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आल्यामुळे पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी कठोर निर्णय घेत नाल्यात कचरा टाकणाऱ्यांचे पाणी कापण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पालिकेकडून सुरू असून गस्ती पथकात पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
– पालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी क नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱयांकर ‘मुंबई पोलीस अधिनियम 1951’ नुसार कारवाई करण्यात येत असून दोषी व्यक्तींकडून रुपये 200 दंड वसुली तत्काळ करण्यात येत आहे.
– आतापर्यंत रुपये 2 लाख 94 हजार 600 एवढी दंड वसूली करण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे रुपये 93 हजार एकढी दंड वसुली पालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागात करण्यात आली आहे. या विभागातील मानखुर्द, गोवंडी, शिवाजी नगर इत्यादी परिसरांचा समावेश होतो.


























































