
सामना ऑनलाईन । मुंबई
एमजी (मॉरिस गॅरेजेस) मोटर इंडियाने आज हिंदुस्थानातील आपली बहुप्रतिक्षित पहिली कार एमजी हेक्टरची बुकिंग 4 जून 2019 पासून सुरू होत असल्याची घोषणा केली आहे. इंटरनेट कार म्हणून चर्चेत राहिलेल्या या कारबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे हेक्टरसाठी जोरदार बुकींग होण्याची शक्यता आहे.
एमजी आपली वेबसाईट www.mgmotor.co.in वर 4 जूनला दुपारी 12 वाजता ऑनलाईन बुकिंग सुरू करणार आहेत. सुरुवातीला हिंदुस्थानातील 120 केंद्रावर सपोर्ट देणार आहेत. या वर्षी सप्टेंबरपर्यंत त्यांची क्षमता एकूण 250 केंद्रापर्यंत वाढवण्याचे ध्येय बाळगून आहे. एमजी मोटर लवकरच भारतातील आपल्या 50 केंद्राच्या नेटवर्कला हलोल कारखान्यातून हेक्टरचे वितरण करण्यास प्रारंभ करणार आहे.






























































