
माहीम येथील कासा कॅरोलिना इमारतीच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली 51 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 75 टक्के सहमती असून पुनर्विकासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे म्हाडाला सादर करण्यात आली आहे. म्हाडानेही रहिवाशांच्या तक्रारींची शहानिशा करून पुनर्विकासाला एनओसी दिली आहे, अशी माहिती विकासक महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या वतीने देण्यात आली आहे.
माहीममधील कासा कॅरोलिना या इमारतीचा पुनर्विकास विकासक महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन करत आहे. पुनर्विकासासंदर्भात एका ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या सर्व तक्रारींची शहानिशा म्हाडा आणि माहीम पोलीस ठाण्याने पूर्ण केली आहे. म्हाडाने याबाबत आपल्या साहाय्यक अभियंत्यामार्फत तपास पूर्ण केला. याबाबत दोन्ही पक्षकारांच्या बैठका घेऊन निर्णय देण्यात आला आहे. यात कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्याचे उघड झालेले नाही. त्याचबरोबर इमारतीमधील 75 टक्के रहिवाशांनी पुनर्विकासाला सहमती दिली आहे, असेही विकासक महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
























































