
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विरार बोळींज येथील 44 तसेच चितळसर मानपाडा गृहनिर्माण प्रकल्प परिसरातील येथील 27 दुकानांच्या विक्रीसाठीच्या ई-लिलावाला मुदतवाढ देण्यात आली. सुधारित वेळापत्रकानुसार, इच्छुक अर्जदारांना https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी व अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाइन भरणे या प्रक्रियेसाठी आता 10 ऑक्टोबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळांवर ई-लिलावाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.