‘म्हाडा’ इमारतींची गळती थांबणार, मान्सून पत्राशेड परवानगीसाठी महापौरांनी नेमली समिती

294

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अधिकार क्षेत्रातील इमारतींची पावसाळ्यात होणारी गळती लवकरच थांबणार आहे. ‘म्हाडा’च्या इमारतींची गळती रोखण्यासाठी गच्चीवर मान्सून पत्राशेड उभारण्याची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका अधिकार्‍यांची समिती नेमली असून दहा दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अधिकार क्षेत्रातील अनेक इमारतींच्या गच्चीवरून पावसाळ्यात गळती होत असल्यामुळे रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र गच्चीवर पत्राशेड उभारण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने रहिवाशांची गैरसोय होते. त्यामुळे अशा इमारतींना गच्चीवर पत्राशेड उभारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आमदार सुनील प्रभू, माजी आमदार सुनील शिंदे, नगरसेकिका श्रद्धा जाधक यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई इमारत दुरुस्ती क पुनर्रचना मंडळाचे सभापती किनोद घोसाळकर यांनी महापौरांना दिलेल्या पत्रानुसार आयोजित बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार अजय चौधरी, किलास पोतनीस,  उपमहापौर ऍड. सुहास काडकर, किधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, नगरसेकक अभिषेक घोसाळकर, अतिरिक्त आयुक्त ए. एल. जऱहाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

… म्हणूनच घेतला निर्णय

पावसाळ्यात छतावरून गळती होत असल्यामुळे रहिवाशांच्या घरगुती सामानाचे नुकसान होते. शिवाय गळतीमुळे इमारतीलाही धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर आमदारांनी ‘म्हाडा’कडे पत्राशेड उभारण्यास परवानगी देण्यासंदर्भात निधीचा प्रस्ताव देऊन मंजूरही करून घेतल्याचे महापौर पेडणेकर म्हणाल्या. या पार्श्वभूमीवर मान्सून पत्राशेडला परवानगी देण्यासाठी प्रमुख अभियंता (विकास नियोजन),  प्रमुख अग्निशमन अधिकारी,  सह आयुक्त (परिमंडळ-2) क उप आयुक्त (परिमंडळ-1) या पालिका अधिकार्‍यांची समिती नेमल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या