म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली नावडी बाजारपेठेला भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नावडी बाजारपेठमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवरआज म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांसमवेत नावडी बाजारपेठेत जाऊन पहाणी केली. आठवडा बाजार, गणपती मंदिर सभागृह, मारुती मंदिर ते माभळे गणेश कृपा येथील नदीचा गाळ उपसण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी व्यापाऱ्यांना दिले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप,माजी जि.प. उपाध्यक्ष राजेश मुकादम, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत चव्हाण, विभागप्रमुख बाबू खातू, जि.प.सदस्य सौ.माधवी गीते, उपविभागप्रमुख आतिष पाटणे, सरपंच सौ.नीता नारकर, उपसरपंच संजय कदम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर भिंगार्डे, दिलीप रहाटे, ग्रामपंचायत सदस्य वैभव मुरकर, नथुराम सावंत, महिला गटप्रमुख नम्रता शेट्ये, शाखाप्रमुख सौ.शैला सावंत तसेच व्यापारी उपस्थित होते.