म्हाडाच्या 5311 घरांची आज सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5311 सदनिकांच्या विक्रीसाठी उद्या, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाटय़गृह येथे संगणकीय सोडत पार होणार आहे. या सोडतीसाठी अनामत रकमेसह 25,078 अर्ज प्राप्त झाले आहेत. 5311 सदनिकांपैकी 2278 सदनिका प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत असल्याने 3033 सदनिकांच्या वितरणासाठी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.