मी वेगळी

144

>> स्नेहलता कानकेकर, दिवा

टाकाऊतून टिकाऊ

निवांत क्षणांचा उपयोग मी माझ्यातील वेगळेपण जपण्यासाठी करते. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची आवड मला लहानपणापासूनच होती. मला शिक्षक व्हायचं होतं. त्याचदरम्यान लग्न झाले. सुदैवाने सासर चांगले मिळाले आणि शिकण्याची हौस मला पूर्ण करता आली. मी घरीच शिकवणी घ्यायला लागले. त्यानंतर खासगी क्लासेसमध्ये शिकवायला जायला लागले. सायनच्या रॉयल सिटी इंग्रजी शाळेत शिक्षिका म्हणून पाच वर्षे नोकरी केली. पण दिव्याला घर घेतल्याने तो प्रवास त्रासदायक होऊ लागला त्यामुळे ती नोकरी सोडली. घरी बसून काय करायचे असा प्रश्न सारखा सतावायचा. पण मी केवळ स्वस्त बसणारी नव्हतेच. अशावेळी निवांत वेळेत यूटय़ूब चॅनलवर वेगवेगळ्या कलाकृती बघायचे, तशाप्रकारच्या कलाकृती तयार करून बघायचे. असेच बघत असताना पहिल्याच प्रयत्नात मी एक छान वॉलपीस तयार केला आणि तो लोकांना इतका आवडला की त्यातून मला प्रोत्साहन मिळाले. हळहळू वेगवेगळ्या वस्तू तयार करायला लागले. लोकांना आवडायला लागल्या. अशावेळी माझ्या मुलाने कल्पना सुचवली की आई तू इतक्या छान कलाकृती तयार करतेस तर आपण यूटय़ूब चॅनल सुरू करू या. जेणेकरून अन्य लोकांना या कलाकृती बनवता येतील आणि ‘स्नेहा आर्ट’ नावाने गेल्यावर्षीपासून यूटय़ूब चॅनल सुरू केले. त्यानंतर ‘शुगर आर्ट’ या कलेकडे वळले. साखरेपासून वेगवेगळ्या कलाकृती तयार करू लागले. विशेषता रुकवतीसाठी या कलाकृतीचा फायदा होतो. घरी एखादी कलाकृती तयार करून मग त्याचा व्हिडीओ अपलोड करते. आतापर्यंत वर्तमानपत्रांपासून वॉलपीस, प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून पक्षी, तोरणं, राख्या, पणत्या, कॅलेंडर फ्रेम, ग्लास पेण्ंिटग, इअरिंग्स, दांडिया, मुकूट अशा विविध वस्तू तयार केल्या आहेत. यातूनच मी माझे वेगळेपण शोधले आहे.

प्रत्येकीचं स्वतःचं असं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱयांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमच्या स्वतःतील वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळ्या वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता ः श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या