मायक्रोसॉफ्टने आणला सर्वात स्वस्त लॅपटॉप…जाणून घ्या किंमत आणि फिचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायक्रोसॉफ्ट कंपनीने एक स्वस्त लॅपटॉप लॉन्च केला आहे. या लॅपटॉपला Surface Laptop SE असे नाव देण्यात आले आहे. या लॅपटॉपमध्ये Windows 11 चे विशेष वर्जन देण्यात आले आहे. हे विशेष करून विद्यार्थ्यांसाठी डिजाईन करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचा हा सर्वात स्वस्त सरफेस लॅपटॉप आहे.

या सरफेस लॅपटॉपची किंमत सुमारे 249 डॉलर्स( 18,523 रुपये) आहे. या लॅपटॉपची विक्री पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. सध्याच्या काळात सर्व कंपन्या विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रीत करून त्यांच्यासाठी लॅपटॉप तयार करत आहेत. कोरोना महामारीमुळे ई लर्निंगचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सगळेच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यांची गरज लक्षात घेत कंपन्या विशेष करून त्यांच्यासाठी लॅपटॉप बनवत आहेत.

असे लॅपटॉप बाजारात आणताना किंमतीकडेही लक्ष दिले जात आहे. विद्यार्थ्यांना परवडतील असे लॅपटॉप या कंपन्या बाजारात आणत आहेत.मायक्रोसॉफ्टच्या Surface Laptop SE लॅपटॉपची स्क्रीन 11.6 इंच आहे. तर स्क्रीन रिझॉलुशन 1366X768p असे आहे. ऐस्पेक्ट रेशियो 16:9 आहे. या लॅपटॉपमध्ये Intel Celeron N4020 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा 4 किंवा 8 जीबी रॅमसोबत घेता येणार आहे. याला 64GB आणि 128 GB eMMC चा सपोर्ट देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये Windows 11 SE व्हर्जन देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी आणि शिक्षणासाठी उपयोगी असणारे ऑपरेंटिंग सिस्टम आणि फिचर देण्यात आले आहे.

या लॅपटॉपमध्ये 1 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून 720p व्हिडीओ रेकॉर्ड करू शकणार आहे. त्यात सिंगल USB A पोर्ट, USB Type C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. हा लॅपटॉप सहजतेने रिपेअर करता येईल, अशा पद्धतीने बनवल्याचे कंपनीने म्हटले आहे. या लॅपटॉपची बॅटरी 16 तासांची असेल असा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे. हा लॅपटॉप सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनाडा आणि जपानमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र, हिंदुस्थानात हा लॅपटॉप लॉन्च होणार किंवा नाही, याची माहिती देण्यात आलेली नाही.