
टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने नोकर कपात सुरूच ठेवली आहे. मायक्रोसॉफ्टने गेल्या महिन्यात 6 हजार कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर आता कंपनीने नोकर कपातीची दुसरी फेरी सुरू केली आहे. यामध्ये 300पेक्षा अधिक जणांना घरी पाठवले जाणार आहे. गतिमान बाजारपेठेत कंपनीच्या चांगल्यासाठी आवश्यक संघटनात्मक बदल आम्ही अमलात आणत आहोत, असे मायक्रोसॉफ्टच्या वतीने सांगण्यात येतेय. मात्र कोणत्याही विभागातील कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकणार याबाबत काहीच सांगितलेले नाही. एकीकडे मायक्रोसॉफ्ट नोकर कपातीची घोषणा करतेय, तर दुसरीकडे एआयमध्ये गुंतवणूक करून त्याद्वारे कोडिंग आणि अन्य टेक्निकल कामांमध्ये मदत घेत आहे. जून 2024च्या आकडेवारीनुसार या अमेरिकन टेक कंपनीकडे 2 लाख 28 हजार 800 फुल टाईम कर्मचारी होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून टेक कंपन्यांनी धडाधड कर्मचारी कपात सुरू केली आहे.