
अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा कपात करणार आहे. यामध्ये पुन्हा एकदा हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार मायक्रोसॉफ्टच्या विक्री विभागात आता कपात करण्यात येणार आहे. मायक्रोसाॅफ्ट कंपनी सध्याच्या घडीला आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर अधिकाधिक गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे.

मायक्रोसॉफ्टमध्ये ही कपात पुढील महिन्यात होऊ शकते. यामध्ये विक्री विभागातील नोकऱ्यांवर गदा येणार आहे. यासोबत इतर विभागावरही चिंतेचे सावट असणार आहे. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी मे महिन्यात कपात केली होती. यामध्ये विविध विभागांमधून सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मायक्रोसॉफ्ट एआयवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणार आहे.
Intel मध्ये पुन्हा एकदा मोठी कपात, 10 हजारांहून अधिकांना घरचा रस्ता दाखवणार
आता कंपनीकडून डेटा सेंटर आणि एआय संशोधनावर अधिक गुंतवणूक करण्यात येणार आहे. जुलैमध्ये मायक्रोसॉफ्टकडून या नवीन कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली जाणार आहे. तोपर्यंत मायक्रोसॉफ्टचे आर्थिक वर्षही संपणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत मात्र अजूनही, मायक्रोसॉफ्टकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेले नाही.

गेल्यावेळी केलेल्या कपातीमध्ये, प्रामुख्याने सॉफ्टवेअर इंजिनियर आणि इतर नोकऱ्यांवर गदा आली होती. परंतु यावेळी करण्यात येणारी कपात ही प्रामुख्याने, विक्री विभागातील नोकऱ्यांमध्ये होणार आहे. एआयचं वाढतं महत्त्व असल्यामुळे, भविष्यातील गुंतवणूकीसाठी एआयवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करण्याचे उद्दीष्ट आता मायक्रोसाॅफ्टने योजले आहे.



























































