एमआयजी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमआयजी क्रिकेट क्लब राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन 16 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.

महिला एकेरी आणि पुरुष एकेरी अशा दोन गटांत ही स्पर्धा रंगणार असून स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्यांना मिळून एपंदर 1 लाख 10 हजारांची रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संलग्न जिह्यातील खेळाडूंनी आपली नावे आपल्या जिह्यांमार्फत राज्य संघटनेपर्यंत 17 सप्टेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी चौकाजवळ, शिवाजी पार्क, मुंबई येथे सायंकाळी 6 ते 8 दरम्यान नोंदवावीत, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9987045429 या क्रमांकावर संपर्क साधावा.